बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील कृष्णात बडे यांचा प्रामाणिकपणा

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

रस्त्यात सापडलेला मोबाईल केला परत

बीड :  पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना रस्त्यावर पडलेला एक मोबाईल सापडला. मोबाईल उचलून स्वतः जवळ चालू ठेवला. त्यानंतर संबधित मोबाईल मालकाचा फोन आल्यानंतर तो आहे तिथे जावून त्याच्या मोबाईल त्याकडे स्वाधीन केला. हरवलेला मोबाईल मिळाल्याने त्या तरुणाच्या चेहर्‍यावर हास्य फुलले होते. हा प्रामाणिकपणा दाखवला आहे बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील चालक कृष्णात बडे यांनी.. यामुळे त्यांचे कौतूक होत आहे. 

         आहेर वडगाव येथील वचिष्ठ घाडगे यांचा मोबाईल बार्शीनाका येथे पडला होता. तो मोबाईल बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील चालक कृष्णात बडे यांना पेट्रोलिंगला जात असताना दिसला. त्यांनी तो मोबाईल स्वतः जवळ चालुच ठेवला. त्यावर काही वेळानंतर फोन आला. हा मोबाईल माझा असून तो हरवला असल्याचे सांगितले. कृष्णात बडे यांनी खात्री करुन त्यांच्याकडे जावून तो मोबाईल त्यांच्या स्वाधीन केला. आपला हरवलेला मोबाईल मिळाल्यामुळे घाडगे यांच्या चेहर्‍यावर मोठा आनंद दिसून येत होता. बडे यांचा हा प्रामाणिकपणा पोलीसांची मान उंचावणारा आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि.सुजित बडे व सहकार्‍यांनी त्यांचे कौतूक केले.

Tagged