ATYACHAR

पतीला जीवे मारण्याची धमकी देत चुलत सासर्‍याचा सुनेवर अत्याचार

केज क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

केज तालुक्यातील घटना, नराधम
सासर्‍यास तीन दिवसाची कोठडी

 केज  : तालुक्यातील माळेवाडी येथे चुलत सासर्‍याने नात्यातील सुनेवर बळजबरीने अकरा महिन्या पासून वारंवार बलात्कार केल्या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल होताच अवघ्या अर्ध्या तासात आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

      पीडीत महिला ही उसतोड कामगार असून मोलमजुरी करुन आपला उरनिर्वाह भागवते. नात्यातीलच चुलत सासर्‍याने पीडितेच्या पतीसोबत मैत्रीचे संबंध ठेवून तिच्या घरी ये-जा सुरु केली. एके दिवशी तिचा पती वस्ती पासून थोड्या अंतरावर असलेल्या गावात गेल्याची संधी साधून नराधम चुलत सासरा घरी आला. तुझ्या पतीला जीवे मारून टाकीन अशी धमकी देऊन वाईट हेतूने तिच्या हाताला धरून त्याने बळबरीने बलात्कार केला. यानंतर अकरा महिन्यापासून तो सातत्याने तिच्यावर अत्याचार करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीला पोलीसांना लगेच ताब्यात घेतले. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोनि.प्रदिप त्रिभुवन यांच्या मार्गर्शनाखाली फौजदार दादासाहेब सिद्धे हे करत आहेत.

Tagged