केज तालुक्यात पुन्हा रुग्ण

बीड

बीड : केज तालुक्यातील उमरी येथे आज पुन्हा एकजण 23 वर्षीय मुलगा पॉझिटीव्ह आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली. आज पाठविण्यात आलेले बाकीचे सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सकाळीच बीड शहरातील मसरत नगरचे दोन पॉझिटीव्ह आले होते.
आज आढळलेला रुग्ण ठाणे येथून आलेला आहे. तो शेतात 14 दिवस  क्वारंटाईन होता. घरी परतल्यानंतर तो एका खोलीत राहत होता. तो इतरांच्या संपर्कात नव्हता मात्र तो कुटुंबियांच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे.

बीडमध्ये आता 19  अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 2 औरंगाबाद, व एक पुणे येथे उपचार घेत आहेत. आतापर्यंत 82 जणांची नोंद कोरोना पॉझिटीव्ह आहे. त्यातील 2 मयत आणि 61 जणांना डिस्चार्ज झालेला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged