grampanchayat

वशिलेबाजीला धक्का; ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरकारी कर्मचारी येणार

बीड महाराष्ट्र

वशिलेबाजीला धक्का; ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरकारी कर्मचारी येणार
नागपूर, दि. 23 : ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने आरक्षणानुसार खासगी व्यक्तीची नेमणूक करण्याच्या ग्रामविकास विभागाच्या निर्णयाला नागपूर खंडपीठाने चपराक लगावली आहे. याबाबत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय आहुजा, नितीन जामदार यांच्या खंडपीठाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरकारी कर्मचारी नेमावा असा आदेश बुधवारी दिला. तसेच सरकारी, कर्मचारी नसेल तर खासगी व्यक्तीची नेमणूक करता येईल, त्यासाठीची कारणे व गरज ही लेखी स्वरूपात नोंदवून घ्यावी लागेल, असेही आपल्या आदेशात म्हटले आहे.
राज्यातील मुदत संपणार्‍या 12 हजारहून अधिक ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची मुदत जूनमध्ये संपत आहे. कोरोनाच्या साथीमुळे निवडणुका घेता येत नसल्याने आणि विद्यमान सदस्यांना मुदतवाढ देता येत नसल्याने प्रशासक नेमण्याचा निर्णय ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला होता. या निर्णयाविरोधात पुण्यातील विलास कुंजीर व इतरांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीला विरोध करून आंदोलनाचा इशारा दिला होता. ही नियुक्ती करताना पालकमंत्र्यांची मान्यता घेण्याचा आदेश ग्राम विकास मंत्रालयाने दिल होता.


या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या मंडळींनी मात्र, या प्रशासकिय नेमणूकीला विरोध करत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. उच्च न्यायालयाच्या मुंबई तसेच औरंगाबाद खंडपीठाकडे याबाबत याचिक दाखल होत्या. यातील एका याचिकेवर आज निर्णय आला. या निर्णयानुसार अनेक पुढार्‍यांचा प्रशासक होण्याचे स्वप्नभंग झाले आहे.


या विरोधात राज्य शासन सर्वोच्च न्यायलयात जाणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात याचिकाकर्ते विलास कुंजीर यांनी सांगितले की, या प्रशासकाच्या माध्यमातून राजकिय खेळी खेळण्यात येत होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे तिला अटकाव झाला आहे.
खंडपीठाने घेतलेल्या या निर्णयामुळे पालकमंत्र्यांकडे सेटींग लावून बसलेल्या अनेकांचा हिरमोड झाला आहे.

Tagged