death

कोरोनाचे आणखी दोन बळी

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

बीड : जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले असून गत 12 तासात आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. ही बाब अतिशय चिंताजनक असून बीड जिल्हा आरोग्य प्रशासनासमोर मृत्यूचे प्रमाण रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

   अंबाजोगाई शहरातील हाऊसिंग सोसायटीतील एका 90 वर्षीय कोरोनाबाधित वृद्धाचा गुरुवारी मध्यरात्री 2 वाजता मृत्यू झाला. तर परळी तालुक्यातील सिरसाळा येथील एका 60 वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने परळी आरोग्य प्रशासनाने स्वॅब घेतल्यानंतर उपचारार्थ अंबाजोगाई येथील कोरोना रुग्णालयात पाठविले. त्याठिकाणी स्वॅबचा अहवाल येण्यापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मध्यरात्री त्याचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, आता मृत्यूसंख्या 24 झाली आहे. दरम्यान, राज्याचा एकंदरीत कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू दर 3.72 इतका असताना बीड जिल्ह्याचा मृत्यूदर मात्र 4.2 च्या पुढे गेला आहे.

Tagged