corona-death

कोरोनाबाधित मृताच्या अंत्यविधिस अंबाजोगाईमध्ये स्थानिकांचा विरोध

अंबाजोगाई कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

अंबाजोगाई : शहरातील हाऊसिंग सोसायटीतील एका 90 वर्षीय कोरोनाबाधित वृद्धाचा गुरुवारी मध्यरात्री 2 वाजता मृत्यू झाला. मृताच्या अंत्यसंस्कारास बोरुळा येथील स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आता शहरातील स्टेडियमजवळ स्मशानभूमीसाठी शेडची उभारणी करण्यात येत आहे.  अंबाजोगाई शहरात बुधवारी आढळून आलेल्या सात रुग्णापैकी एकाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी प्रशासन करीत असताना स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी यांनीही यापूर्वीच ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. पण प्रत्यक्षात आज अंत्यसंस्कारावेळी स्थानिकांचा विरोध पाहून स्टेडियम जवळ कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीसाठी शेड उभारणीचे काम प्रशासनने हाती घेतले आहे.

Tagged