कार-पिकअपचा भीषण अपघात; डॉक्टर बोराटेंचा मृत्यू,चौघे जखमी

आष्टी क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

नगर-आष्टी रस्त्यावरील बाळेवाडी फाट्यावरील घटना
आष्टी
दि.14 : नगर-आष्टी रस्त्यावर बाळेवाडी फाट्याजवळ महिंद्रा कार आणि पिकअप या दोन वाहनांची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. या अपघातात एक ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि.14) मध्यरात्री घडली. जखमींना नगर जिल्ह्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरातील बाळेवाडी फाटा येथे नगर-जामखेड रोडवर पिकअप (एमएच-04 टीयू- 1361) व महेंद्रा टियूव्ही कारची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. या अपघातात महेंद्रा कारमधील चालक डॉ.बोराटे यांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी अंभोरा पोलीसांनी धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील दुर्घटनाग्रस्त वाहने बाजुला करण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी अंभोरा ठाण्याचे कांबळे मेजर, राऊत, अजय बोडखे, वामन हे उपस्थित होते.

Tagged