13 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


खडकीघाट येथील वस्तीवरील घटना
नेकनूर
दि.15 : बीड तालुक्यातील खडकी घाट येथील वस्तीवरील एका पत्र्याच्या शेडमध्ये 13 वर्षीय मुलाचा मृतदेह बुधवारी (दि.15) सकाळी आढळून आला. कुटूबियांकडूनच गळा आवळून खून केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली असून पुढील तपास करत आहेत.
राकेश उमेश वाघमारे (वय 13) असे मयताचे नाव आहे. त्याचा मृतदेह बीड तालुक्यातील खडकी घाट येथील खोखडोह वस्तीवरील शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये बुधवारी सकाळी आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडली आहे. कुटूबियांकडूनच गळा आवळून त्याचा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी पो.ना अमोल नवले, खाडे, घोलप, राऊत, चव्हाण यांनी धाव घेतली आहे. मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच अपघात आहे की, घातपात हे स्पष्ट होणार आहे.

Tagged