crime

ब्लेडने वार करत, गळा दाबून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

बीड दि.14 : कौटुंबिक वादातून पती, सासू आणि सासरा यांनी कट रचून झोपेत असलेल्या विवाहितेवर ब्लेडने वार केले. त्यानंतर जखमी झालेल्या विवाहितेचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून तिन्ही आरोपींवर बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
सविता भागुजी रोहीटे (वय 25, रा.आहेर वडगाव) असे त्या विवाहितेचे नाव आहे. तिच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि.09) रात्री पती आणि सासूने जुने घरगुती वाद उकरून काढून तिला शिवीगाळ सुरु केली. वाद वाढवायचा नसल्याने 10 वाजता ती खोलीत जाऊन झोपली. मध्यरात्री झोपेत असताना पती भागुजी सुरेश रोहिटे याने दाढीच्या ब्लेडने तिच्या कपाळावर वार केला. मार लागल्याची जाणीव झाल्याने सविता उठली आणि पातील जाब विचारला. तेंव्हा त्याने ब्लेड फेकून देत तुला जीवेच मारतो म्हणत तिचा गळा दाबला. सविताने कशीबशी स्वतःची सुटका करून घेताच पती, सासरा सुरेश देवराव रोहिटे आणि सासू कुशीवार्ता या तिघांनी तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने केसाला धरून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने ती बेशुद्ध झाली. सदर फिर्यादीवरून तिन्ही आरोपींवर कलम 307, 323, 504, 34 अन्वये बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक आवारे करत आहेत.

Tagged