shetakari suicide plan

बियाणे न उगवल्याने शेतकर्‍याचा कृषी दुकानासमोरच आत्महत्येचा प्रयत्न

केज क्राईम न्यूज ऑफ द डे मराठवाडा शेती

बियाणे उगवून न आल्याने शेतकरी आक्रमक
नांदुरघाट : सोयाबीनचे बियाणे उगवून न आल्याने एका संतप्त वृद्ध शेतकर्‍याने कृषी दुकानासमोर अंगावर रॉकेल ओतत आत्महत्येचा प्रयत्न केला. आजुबाजूला शेतकरी असल्यामुळे या शेतकर्‍याचा जीव वाचला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यातील नांदुरघाट परिसरात ही धक्कादायक घटना आहे. लालासाहेब दादाराव तांदळे (वय 55 रा.फकराबाद ता.वाशी, जिल्हा उस्मानाबाद) अस शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांची नांदुरघाट परिसरात शेती आहे. त्यांनी सोयाबीनचे श्रेनिक कृषि सेवा केंद्र येथून बियाणे खरेदी केले होते. पेरणी नंतरही बियाणे उगवून न आल्याने त्यांनी कृषि दुकानादाराकडे तक्रार केली. बीयाणे बदलून देण्याची मागणी केली. मात्र दुकानादाराने काहीही ऐकून घेतले नाही. त्यामुळे दुसरे बियाणे घेण्यासाठी पैसेही नाही या नैराश्यातून शेतकर्‍याने कृषि दुकानासमोरच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. आजुबाजूला असलेल्या शेतकर्‍यांनी प्रसंगावधान साधून त्यांना वाचवले.

शेकडो शेतकर्‍यांचे बियाणे उगवलेच नाही
याच परिसरातील शेकडो शेतकर्‍यांनी पेरणी केली. मात्र बियाणे उगवले नसल्याने नांदुरघाट येथील पोलीस चौकीमध्ये धाव घेतली आहे. शेतकरी आक्रमक झाले असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.