पतंजलीचा युटर्न, कोरोनावर औषध बनवलेच नसल्याचा दावा

देश विदेश न्यूज ऑफ द डे

मुंबई: कोरोनावर औषध कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेले असताना, पतंजलीने कोरोनील हे औषध काढल्याचा दावा केला आणि तशी पत्रकार परिषद घेतली देखील. मात्र, उत्तराखंड सरकारने आम्ही अशा औषधाला परवानगी दिलीच नव्हती असं सांगितल्यानंतर, पतंजलीला नोटीस पाठवण्यात आली. उत्तराखंड आयुष विभागानं नोटीस जारी केल्यानंतर पतंजलीनं करोनावरील औषध बनवल्याच्या दाव्यावरून यू-टर्न घेतला आहे. कोरोनिल नावाचं औषध पतंजलीनं लॉन्च केलं. केंद्रीय आयुष मंत्रालयानं औषधाच्या जाहिरातीवर बंदी आणत औषधाच्या चाचण्या सुरू केल्या.

पतंजलीचं औषध जगासमोर आल्यानंतर उत्तराखंड आयुष विभागानं परवानगी दिली नसल्याचं सांगितलं. तसंच पतंजलीला नोटीसही जारी केली होती. या नोटिसीला अखेर पतंजलीकडून उत्तर देण्यात आलं आहे. नोटिसीला उत्तर देताना करोना बरं करणार कोणतंही औषध बनवले नसल्याचं पतंजलीनं म्हटलं आहे.

पतंजलीनं औषध बाजारात आणल्यानंतर उत्तराखंड आयुष विभागानं करोनावर औषध बनवण्याची परवानगी दिली नव्हती असा खुलासा केला होता. पतंजलीनं केवळ ताप, खोकला व प्रतिकारक शक्ती वाढवणारं औषध बनवण्यासाठी परवानगी घेतली होती. त्यांच्या अर्जात करोनाचा उल्लेखही नव्हता. त्यामुळे पतंजलीला नोटीस पाठवू, असं उत्तराखंड आयुष विभागाच्या परवाना अधिकार्‍यानं म्हटलं होतं. त्यानंतर 24 जून रोजी पतंजली दिव्या फार्मसीला नोटीस बजावण्यात आली होती. सध्या केंद्र सरकारनं करोनाची जाहिरात व विक्री बंद केली आहे. केंद्रीय आयुष मंत्रालय या औषधाच्या चाचण्या घेत आहे.

Tagged