rummy, tirat, jugar

साकुड येथे जुगार अड्ड्यावर धाड; ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाची कारवाई

अंबाजोगाई : तालुक्यातील साकुड येथे एका शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी (दि.२५) सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान पोलीसांनी धाड टाकुन ५१ लाख १७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन बारा जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या पथकाने केली.

खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई तालुक्यातील साकुड शिवारातील दत्ता मानाजी शेप (रा. शेपवाडी) यांच्या शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये काही लोक तिर्रट नावाचे जुगार खेळतात अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान घटनास्थळी जाऊन आरोपींना जुगार खेळतांना रंगेहाथ पकडले. तसेच यावेळी ५१ लाख १७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस नाईक तानाजी तागड यांच्या फिर्यादीवरुन बारा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि चौधर, पो. ना. तानाजी तागड, बीट अंमलदार मोरे, शुभम राउत, नाना राऊत, शिनगारे, रामेश्वर सुरवसे, पठाण देवकते, यांनी केली असुन तपास मोरे हे करत आहेत.

बारा आरोपी ताब्यात
१) श्रीमंत साहेबराव गोरे (वय ६ ९ वर्ष रा.कारी ता. धारूर) २) श्रीकृष्ण श्रीरामजी सोनी (वय ६२ वर्ष रा. ओमशांती अंबाजोगाई) ३) जनार्धन कोडींबा उमाटे (वय ५५ वर्ष, रा. पोखरी ता. अंबाजोगाई) ४) विश्वनाथ रानबा दौंड (वय ४० वर्ष, रा. दौंडवाडी ता. परळी) ५) बाळकृष्ण विठ्ठल लांडे (वय ३८ वर्ष, रा. घाटसावळी ता. बीड) ६) नानासाहेब दत्ताजय कदम (वय ४२ वर्ष रा. घाटनांदुर ता. अंबाजोगाई) ७) प्रकाश देऊ चव्हाण (वय ३८ वर्ष रा. घाटसावळी ता. बीड) ८) ज्ञानोबा विठ्ठलराव तांदळे (वय ५२ वर्ष रा. सारडगांव ता. परळी) ९) गजानन माणिकराव आरोळे (वय ४४ वर्ष. रा. टी. पी. एस. कॉलनी परळी ता. परळी) १०) संभाजी भानुदास शिंदे (वय ४१ वर्ष रा. नित्रुड ता. माजलगाव) ११) संतोष तात्या केकाण (वय ४० वर्ष रा. चौभारागल्ली अंबाजोगाई ता. अंबाजोगाई) ११) दत्ता मानाजी शेप (रा. शेपवाडी). या आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे नोंद केले आहेत.

Tagged