anil deshmukh, parambir sing

बिग ब्रेकींग… गृहमंत्री देशमुख यांनी दर महिन्याला 100 कोटीची मागणी केली होती

क्राईम देश विदेश न्यूज ऑफ द डे

मुंबई, दि. 20 : राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ प्रकाराचा आज भांडाफोड झाला आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहून मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिन्याला माझ्याकडून 100 कोटी रुपयांची मागणी केली होती, असा आरोप त्या पत्रात केला आहे.

पत्रातील मजकुरानुसार गृहमंत्री देशमुख यांनीच सचिन वाझे यांना टार्गेट दिलेले होते. त्याच्यावर पैसे गोळा करण्याची जबाबदारी सोपवलेली होती असाही खळबळजनक मजकूर या पत्रात आहे. या शिवाय त्यांनी काही चॅटींगचे स्क्रीन शॉट देखील या पत्रासोबत जोडले आहेत.
सचिन वाझे यांना देशमुख यांनी अनेकदा त्यांच्या बंगल्यावर बोलावले होते. त्यांची भेट देखील जमा झाली होती. हे पैसे गोळा करण्यासाठी देशमुख यांनी मुंबईतील प्रत्येक बार कडून 2 ते 3 लाख रुपये जमा करावेत असेही वाझे यांना सांगितल्याचे पत्रात म्हटले आहे.