beed dcc

बीड डीसीसी बँकेचा निवडणूक निकाल जाहीर

न्यूज ऑफ द डे बीड राजकारण

निकालात महाविकास आघाडीचे पारडे जड
बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातील सर्वच 11 अर्ज बाद झाल्याने केवळ 8 जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यात भाजपने मतदानाच्या 24 तास आधी बहिष्कार घातला आहे. तरी देखील 57 टक्के मतदान झाले. मतदान झालेल्या आठ ही जागांसाठीचे निकाल हाती आले आहेत. समृत जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
हाती आलेले असे आहेत निकाल
प्रक्रिया मतदारसंघ -भाऊसाहेब नाटकर यांना 42 मते मिळाली. संगीता बडे यांचा पराभव झाला असून केवळ 1 मत मिळाले.
पतसंस्था मतदारसंघ -राजकिशोर मोदी 57 मतांनी दणदणीत विजयी. तर मिळालेली मते गंगाधर आगे -36, राजकिशोर मोदी- 93 तर अशोक लोढा -1 मत
इतर शेती मतदारसंघ –अमोल आंधळे 212 मतांच्या फरकाने विजयी. धनराज राजाभाऊ मुंडे यांना 9 तर बदामराव पंडीत यांना 2 मते.
महिला राखीव मतदारसंघ -सुशीला शिवाजी पवार (भाजप), कल्पना दिलीप शेळके (क्षीरसागर समर्थक) विजयी. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार नव्हते.
अनुसूचित जाती मतदार संघ -काँग्रेसचे रवींद्र दळवी 720 मते घेऊन विजयी.
ओबीसी मतदारसंघ -कल्याण आखाडे विजयी. त्यांना 716 मते मिळाली.
विमुक्त जाती मतदारसंघ -सूर्यभान मुंडे हे विजयी झाले आहेत.

Tagged