suresh dhas

आबांच्याच पक्षाच्या गृहमंत्र्याने गृह विभागाला कलंकित केले

न्यूज ऑफ द डे बीड राजकारण

आमदार सुरेश धस यांची टीका
बीड : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी 100 कोटींची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री स्व.आर.आर. आबांच्याच पक्षाच्या गृहमंत्र्याने महाराष्ट्राच्या गृह विभागाला कलंकित केले, अशी टीका सुरेश धस यांनी केली.

पुढे बोलताना आमदार धस म्हणाले, 90 च्या दशकात पोलीसांचे मनोबल वाढवून कुख्यात गँगस्टरांचे रेकॉर्डब्रेक एन्काउंटर करुन मुंबईतील टोळी युद्धांचा खात्मा करणारे स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे, डान्सबार बंदीचा धाडसी निर्णय घेऊन तो न्यायालयात यशस्वीपणे टिकवणारे स्व. आर.आर.आबा, पाच वर्ष सक्षमतेने मुख्यमंत्रीपदासोबत गृहखाते निष्कलंक कारभार पाहणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री कसा असावा याचा आदर्श घालून दिला. परंतू स्व.आर.आर. आबांच्याच पक्षाच्या गृहमंत्र्याने महाराष्ट्राच्या गृहखात्याला कलंकित केले. सदरील प्रकरण अत्यंत गंभीर असून या बाबत मुख्यमंत्र्यांनी व पक्षाच्या प्रमुखांनी तत्काळ निर्णय घ्यावा, असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

Tagged