निराधार वृद्ध महिलेला केजच्या युवासेना तालुकाप्रमुख अरविंद थोरात यांचा आधार

केज न्यूज ऑफ द डे

वृद्ध महिलेची कोल्हापूरच्या वृद्धाश्रमात रवानगी
केज : येथील मंगळवार पेठेच्या कॉर्नरजवळ गजबजलेल्या गर्दीत 14 मार्च रोजी एक वृद्ध महिला बेशुद्धावस्थेत पडलेली होती. ही माहिती मिळताच युवासेना तालुकाप्रमुख अरविंद थोरात यांनी धाव घेत वृद्ध महिलेची विचारपूस केल्यानंतर निराधार असल्याचे समजले. त्यामुळे त्या आजीची कोल्हापूरच्या साऊली केअर सेंटर या वृद्धाश्रमात शुक्रवारी रवानगी केली.

बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या वृद्ध महिलेवर रूग्णालयात नेऊन उपचार केल्यानंतर ती निराधार असल्याचे समजले. त्यामुळे युवासेना तालुकाप्रमुख अरविंद थोरात वृद्धाश्रमांशी संपर्क साधला. कोल्हापूर येथील साऊली केअर सेंटर या वृद्धाश्रमात घेण्यासाठी संचालकांनी होकार दिला. परंतू कोरोनाची तपासणी, उपचारानंतर रुग्णालयातून सुटी मिळताच आजीला वृद्धाश्रमात दाखल केले. एका निराधार, बेवारस वृद्ध महिलेला जीवदान दिल्याचे समाधान शिवसैनिकांच्या चेहर्‍यावर दिसत होते. या कामासाठी युवासेना तालुकाप्रमुख अरविंद थोरात, तात्या रोडे, युवा सेनेचे उपशहर प्रमुख शंकरसिंग गोखे, युवासेना उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर बोबडे, ऋषिकेश घुले, हनुमंत सत्वधर, अनिकेत शिंदे, प्रशांत गुंड, रोहित कसबे, विशाल नाईकवाडे व युथ फाऊंडेशनचे कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला. युथ फाऊंडेशनसह युवा सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे कौतूक होत आहे.

80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारणअरविंद थोरात
समाजसेवेची मला आवड आहे. मी ती माझ्या परीने शक्य होईल तितकी करत असतो. ती सुरुच ठेवणार आहे. मी राजकारणात असल्यामुळे माझ्या सामाजिक कृतींबद्दलही लोक कधी काय बोलतात? हे सांगता येत नाही. त्या मतांची पर्वा न करता मी कार्य सुरु ठेवलेले आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण या पक्ष धोरणानुसार मी काम करत आहे, असे युवासेना तालुकाप्रमुख अरविंद थोरात यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना म्हटले आहे.

Tagged