सासुच्या अंगठीसाठी सुनेचा खून

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी बीड

पतीसह सासु-सासर्‍यावर गुन्हा दाखल

बीड  : लग्नामध्ये सासुला अंगठी न घेतल्यामुळे सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा छळ सुरु होता. माहेरहून अंगठीसाठी पैसे आणण्यासाठी तगदा लावला जात होता. मात्र नकार दिल्यामुळे पती, सासु, सासरा यांनी संगनमताने तिचा खून केला. ही खळबळजनक घटना परळी तालुक्यातील आचार्यटाकळी येथे घडली. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात पती, सासरा, आणि सासू यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        मनिषा साहेबराव काळे (वय 22 रा.पाडोळी ता.परळी) असे मयत महिलेचे नाव आहे. मनिषाचा परळी तालुक्यातील आचार्य टाकळी येथील जगन्नाथ संदीपान आचार्य याच्या सोबत दि.17 फेब्रुवारी 2019 रोजी रितीरिवाजाप्रमाणे करण्यात आला होता. परंतु लग्नामध्ये सासूला अंगठी घातली नाही असे म्हणून विवाहित मनीषा हिला पती, सासरे आणि सासू हे सतत अंगठी करण्यासाठी 2 लाख रुपये तुझ्या वडिलांकडून घेऊन ये अशी मागणी करत होते. मुलीच्या वडिलांची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे ते अंगठीसाठी पैसे देऊ शकले नाहीत. त्यामुळे मनिषाचा मानसिक, शारीरिक छळ सुरु होता. या बाबत मुलीने वेळोवेळी फोन वरून सांगितले तर दि.23 जुलै 2020 रोजी पंचमीनिमित्त माहेरी अली असता आपल्यावर होणार्‍या मारहाणी बाबत आईवडिलांना सांगितले तर आपण 3 महिन्याची गरोदर असल्याचे हि आईला सांगितले होते. असे असतानाही आई आपल्याच मुलीची समजूत काढून 30 जुलै 2020 रोजी सासरी आचार्य टाकळी येथे नेवून सोडले होते. परंतु या हि वेळी तिचा पती जगन्नाथ याने तू मंगळवारीच माहेर वरून परत का आली नाही म्हणून कंबरेच्या बेल्ट ने मारहाण केली. याची हि माहिती मुलीने फोन वरून आम्हाला सांगितली होती. परंतु दि.05 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 7 वाजता जावई जगन्नाथ आचार्य याचा चुलत भाऊ संतोष आचार्य याने फोन करून तुम्ही टाकलेला ताबडतोब या तुमची मुलगी सिरियस आहे. असे सांगितल्या वरून आम्ही गावातील मोहन व्यंकटराव बडे यांची दुचाकी घेऊन टाकळी येथे गेलो असता. माझी मुलगी मनीषा हिचे प्रेत तिच्या बेडरूममध्ये जमिनीवर पालथ्या अवस्थेत झोपवले होते. आणि ते प्रेत कपड्याने झाकलेले होते. सादर प्रेताची पाहणी केली असता तिच्या दोन्ही हातावर कपाळावर कंबरेवर दोन्ही बाजूने मारल्याच्या जखमा होत्या तसेच छातीवर डाव्या व उजव्या हाताच्या बोटावर,पायावर मारहाण केल्याचे काळसर वन दिसून आले. तर तिच्या तोंडामध्ये कापसाचा बोळा आढळून आला. या प्रकरणी सिरसाला पोलिसांना माहिती दिली असता पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहचून घटनेचा पंचनामा केला व मनिषाचे प्रेत अंबाजोगाई येथे शवविच्छेनासाठी पाठवण्यात आले. रात्री उशिरा अहवाल आल्यानंतर आरोपी पती, सासरा, सासू या तिघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर.214 /2020 कलम 302, 498, 329, 504, 506, 34 भादवि सह कलम 3, 4 हुंडा प्रतिबंधक कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि.श्रीकांत डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुरी करत आहेत. गुन्ह्यातील सर्व आरोपी फरार आहेत.

Tagged