स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बीड दि.18 : रोडवर जॅक टाकून दरोडा घालणार्या टोळीतील एक वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी मंगळवारी (दि.18) जेरबंद करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या (beed lcb team) टिमने केली. त्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
विक्रम आप्पा शिंदे (रा.नांदूरघाट ता.केज) (vikram appa shinde) असे आरोपीचे नाव आहे. 23 मे 2022 रोजी मस्साजोग शिवारात रस्त्यावर जॅक टाकला, त्याच्या अमिषाने खाली उतरलेल्या ट्रक चालकावर सशस्त्र दरोडा टाकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेनी उघडकीस आणली होती. यातील निष्पन्न असलेला आरोपी विक्रम शिंदे हा तेव्हापासून फरार होता. मंगळवारी नांदूरघाट (nandurghat) येथून त्यास ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, सुशांत सुतळे, पोह.रामदास तांदळे, बालकृष्ण जायभाये, मारुती कांबळे, राजु पठाण, भागवत शेलार, अर्जुन यादव, अतुल हराळे यांनी केली. पुढील तपासकामी आरोपीस केज पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.