बीडमध्ये जोडे मारो आंदोलन करत किरीट सोमय्यांचे बॅनर जाळले!

न्यूज ऑफ द डे बीड

जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक रस्त्यावर

बीड, दि.18 : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ वायरल झाल्याने राज्यभरात सर्वत्र आक्रोश पाहायला मिळत आहे. याबरोबरच बीडमध्ये देखील याचे पडसाद उमठले आहेत. ठाकरे गटाच्या संतप्त शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून किरीट सोमय्याचा जाहीर निषेद करत जोडे मारो आंदोलन करत आपला आक्रोश व्यक्त केला आहे.

बीड शिवसेना जिल्हाप्रमुख मा अनिलदादा जगताप यांच्या मार्गदर्शना नेतृत्वाखली मंगळवार, दि.18 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बीड येथे शिवसेना महिला आघाडी अंगीकृत संघटनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन बेटी को भाजप से बचाव या नाऱ्याची घोषणाबाजी करत जोडे मारो आंदोलन केले. एवढेच नाहीतर भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्या फोटो बॅनरवर लाथा बुक्या मारत बॅनर पायदळी तुडवून बॅनर जाळले आहे.

नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी किरीट सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बीड शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. बेंबीच्या देठापासून बेटी बचाओ, बेटी पढाओ म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्यांच्या अशा कृत्यामुळं बेटी को भाजपा से बचाओ असं दुर्दैवानं म्हणण्याची वेळ आली असल्याचे मत यावेळी केले. किरीट सोमय्याला फाशी सारखी कठोर शिक्षा देण्यात यावी अन्यथा भाजपा विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस कधी कारवाई करणार आहेत असा प्रश्न माध्यमांसमोर बीड शिवसेनाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडला आहे. शिवसेनेच्या जोडे मारो या आंदोलनासाठी शिवसेना सर्व जिल्हासंघटक, उपजिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहर प्रमुख,उपशहर प्रमुखआणि शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली.

शिवसैनकांचा ‘बेटी को
भाजप से बचाव’ नारा

बेटी बचाओ, बेटी पढाओ असा नारा देत भाजप राज्यभरात आणि देशभरात आपली नैतिक मूल्य किती उच्च दर्जाची आहेत हे सिद्ध करते तर दुसरीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा अश्लील व्हिडिओ माध्यमांसमोर येतो. यावरून भाजपचे ढोंग आता उघडे पडले असून भाजपाचे बेटी बचाओ हे धोरण सपशेल तकलादू आणि खोट्या स्वरूपाचे आहे त्यामुळे बीडमध्ये किरीट सोमय्या विरोधात संतप्त शिवसैनिकांनी केलेल्या जोडे मारो आंदोलनात बेटी को भाजप से बचाव हा नारा दिला.


Tagged