कोरोना उपचारानंतर कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचे मृत्यू

कोरोना अपडेट क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.4 : बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे यांचे बुधवारी (दि.4) पहाटे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर बीडच्या खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचारानंतर ते मंगळवारी घरी परतले. मात्र, बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बीडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
बीडचे जिल्हा कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांना कोरोनाची लागण झाल्यावर त्यांना बीडच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला होता. घरी परतल्यावर बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. मूळचे शिक्षक असलेले कांबळे या आधी मुंबईला होते. कुख्यात दहशतवादी कसाब आणि दहशतवाद्यांच्या बराकीच्या सुरक्षेची त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tagged