बीड जिल्ह्यातील लॉकडाऊनबाबत झाला ‘हा’ निर्णय

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

महाराष्ट्र अनलॉकच्या दिशेने

मुंबई : राज्यातील अनलॉकबाबत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असताना मुख्यमंत्री कार्यलयाने आज (दि.5) पहाटे महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूना जारी केली आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यानुसार पाच टप्प्यात निर्बंध शिथिल केले जातील.

ही अधिसूचना सोमवारपासून (7 जून) लागू होईल. अनलॉक करत असताना पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. पहिल्या स्तरात 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसर्‍या स्तरात 2 जिल्ह्यांचा समावेश आहे. तिसर्‍या स्तरात 15 जिल्ह्यांचा समावेश आहे तर चौथ्या स्तरांमध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्या पाचव्या स्तरात एकही जिल्हा नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढली तर पाचव्या स्तरात त्या जिल्ह्याचा समावेश केला जाईल. 20 टक्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट असेल आणि 75 टक्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील, तो पाचवा स्तर असेल.

बीड जिल्ह्याचा तिसर्‍या टप्प्यात समावेश,
काय बंद आणि काय सुरु राहणार?

 • अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहतील अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद राहतील
 • मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील
 • हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत खुली रहातील. दुपारी 2 नंतर पार्सल सेवा सुरू राहिल. शनिवार आणि रविवार बंद राहतील.
 • सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 यावेळेत सुरू रहातील
 • खाजगी आणि सरकारी कार्यालयात 50 टक्के क्षमतेने उपस्थिती राहील
 • इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील
 • सिनेमा चित्रीकरणाला स्टुडीओ मध्ये परवानगी असेल
 • सामाजित, सांस्कृती, मनोरंजनात्म कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील (सोमवार ते शुक्रवार)
  -लग्न सोहळे 50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार 20 जणांची उपस्थिती, इतर बैठका 50 टक्के उपस्थित राहील
 • कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील
 • दुपारी 2 वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहिल.
 • सध्या पाचव्या टप्प्यात एकही जिल्हा नाही. जर पुढील आठवड्यात जास्त रुग्णसंख्य वाढली तर पाचव्या टप्प्यामध्ये समावेश होईल.
Tagged