गंगावणेला तीन दिवसाची पोलीस कोठडी
बीड दि.21 : वडवणी पोलीस ठाण्यातील (wadwani police station) कर्मचार्यास 10 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. दरम्यान ही लाच देण्यासाठी प्रोत्साहन देणार्यावरही बुधवारी (दि.21) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सुुर आहे. तर लाचखोर कर्मचार्यास 23 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Increase of one accused in Vadvani trap)
(pradeep shelake) प्रदिप शेळके (रा.उपळी ता.वडवणी) असे लाच देण्यासाठी प्रोत्साहन देणार्या आरोपीचे नाव आहे. वडवणी ठाण्यातील अदखलपात्र गुन्ह्यात तक्रारदार व त्यांचे कुटुंबीयावर कारवाई न करण्यासाठी व पोलीस ठाण्यातच प्रकरण मिटविण्यासाठी रेवनाथ नायबा गंगावणे याने 30 हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती 10 हजाराची लाच स्वीकारताना उस्मानाबाद एसीबी (usmanabad acb team) टिमने रंगेहाथ पकडले. दरम्यान ही लाच देण्यासाठी तक्रारदारास प्रदिप शेळके याने प्रोत्साहित केले होते. तो फरार असून बीड एसीबी टिम त्याचा शोध घेत आहे, अधिक तपास निरीक्षक रविंद्र परदेशी करत आहेत.