acb trap

बीड जिल्ह्यात लाचखोरी कमी होईना; पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात!

क्राईम न्यूज ऑफ द डे शिरूर

बीड दि. 22 : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात विशेष पोलीस दल आघाडीवर असल्याचे दिसत आहे. वडवणी येथील कर्मचाऱ्यास लाच प्रकरणात अटक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिरूर (shirur police station) पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यावर एसीबीने (police head consteble trap) कारवाई केली आहे.

शिवाजी श्रीराम सानप असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे. तक्रारदार यांचा मुलगा, पुतण्या व सून यांचेवर शिरूर कासार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात मदत करून प्रतिबंधक कारवाईमध्ये जामीन करायला मदत करण्यासाठी पंचासमक्ष 5000 रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला. लाच मागणी पडताळणी दरम्यान निष्पन्न झाल्याने शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार सुरेश सांगळे, भरत गारदे, अविनाश गवळी, चालक उगले यांनी केली.

Tagged