बीडजवळ कारचा भीषण अपघात;तिघांचा जागीच मृत्यू!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


एक गंभीर जखमी; मित्राच्या लग्नाला जाताना घडली घटना
बीड दि.23 : भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारणे दोन-चार पलट्या खाल्ल्या, या भीषण अपघातात (accident) कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात धुळे सोलापूर (dhule solapur hayave) महामार्गावरील पेंडगावजवळ शुक्रवारी (दि.23) मध्यरात्री झाला. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

धीरज गुणदेजा (वय 30), रोहन वाल्हेकर (वय 32), विवेक कांगुने (वय 33) अशी मयतांची नावे आहेत. तर आनंद वाघ (वय 28) हे जखमी असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे सर्व अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील आहेत. मित्राच्या लग्नाला बीडकडे येत असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले, भरधाव कारणे रस्त्यावर तीन ते चार पलट्या घेऊन रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. यामधे कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक यशवंत घोडके, रवींद्र नागरगोजे, बीड ग्रामीण लक्ष्मण जायभाये, रवी सानप तसेच महामार्ग पेट्रोलिंग टीमचे प्रमुख प्रतीक कदम, सुनील कवडे, राम गायकवाड तसेच महामार्ग रुग्णवाहिका डॉक्टर विशाल डोंगर, यशवंत शिंदे, चालक सुभाष नन्नवरे यांनी घटनास्थळी धाव जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. (Dhule solapur hayave accident)

Tagged