corona vaccine sputnic v

रशिया याच आठवड्यात सर्वसामान्यांना लस देणार

कोरोना अपडेट देश विदेश न्यूज ऑफ द डे

नवी दिल्ली, दि.7 : रशियाच्या लसीवरून जगात साशंकता असताना आता रशियाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. या ‘स्पुटनिक व्ही’ sputnic v या लसीचं त्यांनी उत्पादन सुरु केलं असून याच आठवड्यात ही लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल, असे वृत्त रशियन वृत्तसंस्था ‘तास’ने दिले आहे.

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 11 ऑगस्ट कोरोनाची लस सापडल्याचे जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला होता. एका रशियन अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यापासून कोरोनाची लस ‘स्पुटनिक व्ही’ sputnic v सामान्य नागरिकांना दिली जाईल. ही लस 11 ऑगस्ट रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लाँच केली होती. रशियन वृत्तसंस्था ‘तास’ने रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या डेप्युटी संचालक डेनिस लोगुनोव्ह यांना सांगितले की रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या परवानगीनंतर ‘स्पुटनिक व्ही’ sputnic v लस व्यापक वापरासाठी दिली जाईल. आरोग्य मंत्रालय या लसीची चाचणी सुरू करणार असून आम्हाला लवकरच त्याची परवानगी मिळणार आहे. रिपोर्टनुसार, ते म्हणाले की सर्वसाधारण लोकांना लस देण्याची निश्चित प्रक्रिया आहे. लोकांपर्यंत लस देण्यासाठी 10 ते 13 सप्टेंबर परवानगी घ्यावी लागेल. यानंतर, ही लस जनतेला देण्यास करण्यास सुरवात होईल. रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ sputnic v ही लस रशियन संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने मॉस्कोच्या गमालेया रिसर्च इन्स्टिट्यूटने अ‍ॅडेनोव्हायरस सोबत तयार केली आहे. यावर्षी जून-जुलैमध्ये या लसीच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या आणि त्यात 76 व्हॉलेंटिअर्स सहभागी झाले होते. निकालात 100 टक्के अँटिबॉडीज विकसित झाल्याचा दावा रशियाने केलेला आहे. अशाप्रकारे रशियाने कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांत पुढं आहे. रशियाने अमेरिका, इंग्लंडचा फॉर्म्यूला चोरल्याचा आरोपही त्यांच्यावर होत आहे.

गुप्तचर यंत्रणांमध्ये स्पर्धा
करोना लस स्पर्धेत रशियाच नव्हे तर चीनचच्या गुप्तचर संस्था एसवीआरने देखील अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडामध्ये हेरगिरी सुरू केल्याचा आरोप याआधी करण्यात आला आहे. रशिया हेरगिरी करत असल्याचा आरोप सर्वप्रथम फायबर ऑप्टिक केबल्सवर लक्ष ठेवणार्‍या ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेने केला होता. इराणनेदेखील करोना लशीच्या संशोधनाला चोरण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करण्यात येत होता. अमेरिकेनेदेखील आपल्या विरोधी देशांविरोधातील हेरगिरी तीव्र केली आहे. त्याशिवाय अमेरिकेतील अनेक महत्त्वाच्या संस्थांची सुरक्षिता वाढवली आहे. चीनच्या हॅकर्सने जानेवारीमध्ये मॅसच्यूसेटच्या एका बायोटेक कंपनीच्या नेटवर्कची रेकी केली होती. ही कंपनी करोनाच्या लशीवर काम करत आहे. या माहितीच्या आधारे ही कंपनी मॉडर्ना इंक कंपनी असण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेची फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन (एफबीआय) ही मॉडर्ना कंपनीच्या संपर्कात असल्याचे मॉडर्ना कंपनीने म्हटले आहे. जगभरातील देशांमध्ये करोना स्पर्धा सुरू असताना आता गुप्तचर संस्थांमध्येही तीव्र स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र आहे.

Tagged