तरुणाचा करंट बसल्याने जागीच मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


बीड : पहाटे बाहेर शौचास गेलेल्या तरुणाचा करंट बसल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील कोल्हारवाडी येथे सोमवारी (दि.7) पहाटे घडली.
किसन कल्याण ढेंगे (वय 23) असे मयताचे नाव आहे. किसन हा शेतीकरी असून दुग्ध व्यवसाय करत होता. सोमवारी पहाटे प्रातविधीसाठी घराबाहेर गेल्यानंतर विद्युत पोलला दिलेल्या तानाच्या तारीमध्ये करंट उतरला होता. त्या तारीला धक्का लागल्याने किसनचा जागीच मृत्यू झाला. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tagged