bussnesmen suside

गळफास घेवून तरुणाची आत्महत्या

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड : शेतामध्ये चिंचाच्या झाडाला ठिबकच्या पाईपने गळफास घेवून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील रामनगर येथे सोमवारी (दि.29) दुपारी उघडकीस आली.

अजय बंडू बरडे (वय 26 रा.रामनगर) असे मयताचे नाव आहे. तो रविवारी रात्री घरातून बाहेर गेला होता. त्यानंतर रात्री घरी न परतल्याने त्याला नातेवाईकांनी संपर्क केला पण संपर्क झाला नाही. सोमवारी दुपारच्या सुमारास शेतात चिंचाच्या झाडाला ठिबकच्या पाईपने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोह.सातपुते, पोना.बाळकृष्ण म्हेत्रे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. आत्महत्येचे कारण मात्र समजु शकले नाही. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहे. अजय बरडे यांच्या पाश्चात आई, पत्नी, भाऊ, मुले असा परिवार आहे.

Tagged