vasantrao salunke

महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.वसंतराव साळुंके

करिअर न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा मुंबई

बीड, दि.21 : महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी बीड जिल्ह्याचे भुमिपूत्र तथा माजलगाव तालुक्यातील सादोळ्याचे रहीवाशी अ‍ॅड. वसंतराव साळुंके यांची तर उपाध्यक्ष म्हणून पुणे येथील अ‍ॅड.राजेंद्र उमाप यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल साळुंके यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची मुंबई येथील कार्यालयात 20 फेब्रुवारी रोजी परिषदेचे मावळते अध्यक्ष अ‍ॅड. गजाननराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते अ‍ॅड. वसंतराव साळुंके यांचे नाव पुढे आले. महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलच्या परिषदेवर चौथ्यांदा निवडून आलेले अ‍ॅड.वसंतराव दिगंबरराव साळुंके गेल्या अनेक वर्षापासून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वकीली व्यवसाय करतात.या निवडीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Tagged