एकाच ओढणीने प्रेमी युगुलाने घेतला गळफास!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


अंबाजोगाई दि.19 ः तालुक्यातील राजेवाडी येथील 24 वर्षीय तरुण आणि 18 वर्षीय तरुणीने झाडाच्या फांदीला एकत्रित गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.19) दुपारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून त्या दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
अनिता शेषेराव राठोड (वय 18) आणि प्रवीण सुधाकर काचगुंडे (वय 24) दोघेही रा.राजेवाडी, ता. अंबाजोगाई अशी त्या दोघा मयतांची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिता आणि प्रवीण हे दोघेही बुधवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास आपापल्या घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी सकाळी अंदाजे 11 वाजताच्या आसपास राजेवाडी शिवारातील गायरानाच्या उतारावरील लिंबाच्या झाडाच्या एकाच फांदीला एकाच ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी 4 वाजताच्या सुमारास काही ग्रामस्थांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरिक्षक महादेव राऊत, उपनिरिक्षक केंद्रे, बीट अंमलदार गुट्टे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आले.

Tagged