राजेसाहेब देशमुख काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : गेल्या काही महिन्यांपासून भारतीय काँग्रेस पक्षात जिल्हाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरु होत्या. राज्यातील 14 जिल्हाध्यक्षांच्या निवडी करण्यात आल्या असून यात बीड जिल्ह्याचाही समावेश आहे. जिल्हाध्यक्ष पदी राजेसाहेब देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

देशमुख हे अंबाजोगाई तालुक्यातील मुळचे माकेगाव येथील असून ममदापूर पाटोदा गटाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. ते जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती होते. त्यांनी पंचायत समितीसह तालुका पातळीवर संघटनात्मक पदांवर काम केलेले आहे. काँग्रेसला खमके नेतृत्व लाभले असल्याच्या प्रतिक्रिया पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या असून अभिनंदन केले जात आहे. दरम्यान, मावळते जिल्हाध्यक्ष पापा मोदी यांच्या पक्षविरोधी कार्यासह भ्रष्टाचार प्रकरणांच्या तक्रारींची दखल घेऊन काँग्रेसने त्यांना पदावरून हटवले आहे.

Tagged