मद्यपी ट्रक चालकाने घेतला पाच जणांचा बळी

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

प्रवाशी रिक्षा, दुचाकीला धडक देऊन ट्रकही पलटी
बीड दि.7 : एका मद्यपी ट्रकचालकाने निष्काळजीपणाने ट्रक चालवत पांगरबावडी येथे एका प्रवाशी रिक्षाला तर घोडका राजुरी येथे दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातामध्ये रिक्षातील पाच जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. अपघातात चारजण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हारुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलीससुत्रांच्या माहितीनुसार, वडवणी येथून बीडकडे रिक्षा प्रवाशी घेऊन येत होता. यावेळी बीडकडून वडवणीकडे जाणार्‍या ट्रकने (एमएच-09 सीव्ही-9644) पांगरबावडी येथे रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षातील तबसुम अबजान पठाण, शारो सत्तार पठाण, रिहाण अबजान पठाण (वय 13), तमन्ना अबजान पठाण (वय 8) व अन्य एक अशी मयतांची नावे आहेत. तर रिक्षा चालक सिद्धार्थ शिंदे, जायबाई कदम, मुजीब कुरेशी, अश्विनी गोविंद पोकळे, गोरख खरसाडे अशी जखमींची नावे आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यानंतर या ट्रकने पुढे घोडका राजुरी येथे एका दुचाकीस धडक दिली. त्यानंतर ट्रक रस्त्याच्याकडेला खड्डयात जाऊन पलटी झाला. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोउपनि.पवनकुमार राजपुत यांच्यासह आदींनी धाव घेतली आहे. ट्रक चालक फरार झाला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Tagged