बापरे! आज 122 पॉझिटिव्ह

न्यूज ऑफ द डे बीड

सलग दुसर्‍यादिवशी रूग्णसंख्या शतकपार
बीड : कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून बीड जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचा आकडा रविवारीही (दि.7) शतकपार आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनचा धोका वाढला आहे.

जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार, 1,222 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 122 अहवाल पॉझिटिव्ह तर 1,100 अहवाल निगेटिव्ह आहेत. यात बीड तालुक्यात सर्वाधिक 51 तर अंबाजोगाई, आष्टी प्रत्येकी 16, गेवराई 12, धारूर, वडवणी प्रत्येकी 1, केज 10, माजलगाव 2, परळी, पाटोदा, शिरूर प्रत्येकी 4 असे एकूण तब्बल 122 पॉझिटिव्ह आले आहेत.

Tagged