corona

दिलासा : कोरोना हजारच्या आत

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड तालुक्यात कोरोनाचे त्रिशतक

बीड : गेल्या तीन दिवसांपासून नव्या रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या अधिक असल्याने दिलासा मिळालेला असतानाच आज (दि.19) पुन्हा कोरोना रूग्णसंख्या हजारच्या आत आला आहे. त्यामुळे जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 4,068 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 975 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 3,093 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील 79, आष्टी 94, बीड 327, धारूर 56, गेवराई 70, केज 108, माजलगाव 53, परळी 30, पाटोदा 88, शिरूर 49 आणि वडवणी तालुक्यात 21 रूग्णांचा समावेश आहे.

Tagged