HARSIMRAT KOUR BADAL

मोदींना वाढदिवसादिवशीच मोठा धक्का; केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा

देश विदेश न्यूज ऑफ द डे

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस असताना त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. मात्र भाजपासोबत केंद्रात सत्तेत असलेल्या शिरोमणी अकाली दलाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा झटका दिला आहे. कृषि क्षेत्राशी संबंधीत अध्यादेश केंद्र सरकार आणत असल्याने त्यातून शेतकर्‍यांचं मोठं नुकसान होणार आहे. याला विरोध म्हणून शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल HARSIMRAT KOUR BADAL यांनी आपल्या केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

भाजपने लोकसभेत गुरुवारी हे विधेयक मांडले होते. त्यावेळी शिरोमणी अकाली दलाचे खासदार सुखबीरसिंग बादल यांनी निषेध केला. हरसिमरत कौर बादल या मंत्रिपदाचा राजीनामा देतील, असंही ते म्हणाले. पण शिरोमणी अकाली दलाचा सरकारला पाठिंबा कायम राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं. हरसिमरत कौर बादल या केंद्रीय अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्री होत्या. मंत्रीपदाच्या राजीनाम्याबद्दल हरसिमरत कौर बादल यांनी ट्विट करून माहिती दिलीय. शेतकरी विरोधी अध्यादेश आणि कायद्याच्या निषेधार्थ आपण केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आपण शेतकर्‍यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे आहोत आणि त्याचा अभिमान आहे, असं कौर यांनी स्पष्ट केलं.

Tagged