atyachar

कायद्याचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थीनीवर विद्यालयातीलच विद्यार्थ्याकडून अत्याचार!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.24 : कायद्याचे शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थीनीला तिच्या पुढच्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्याने लग्नाचे अमिष दाखवले. त्यानंतर तिचा विश्वास संपादन करुन तिच्यावर तब्बल सहा वर्षे अत्याचार केले. त्यानंतर एका दुसर्‍या मुलीशी संसार थाटणार असल्याची माहिती पीडितेला मिळाली. त्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठून तरुणाविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऋतुजा (नाव बदललेले) हीने पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, एलएलबी शिक्षणासाठी 2017 ला विद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेतला. यावेळी अ‍ॅड.गणेश हनुमंत तावरे (रा.इंद्रप्रस्थ कलनी बालेपीर नगर रोड बीड) हा एलएलबी द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्यानंतर काही दिवसांनी माझ्या मैत्रीणीच्या फोनवर गणेशने फोन करुन माझ्याकडे फोन द्यायला सांगितला. ‘मला तू खूप आवडतेस, तुही माझ्यासोबत प्रेम कर’ असं म्हणाला. त्यावर मी त्याला प्रेम करण्यापेक्षा माझ्यासोबत लग्न कर असं म्हणाले. त्यावर त्याने फोन कट केला. त्यानंतर काही दिवस फोन केला नाही. परत मॅसेज करण्यास सुरुवात केली. माझे प्रेम असून लग्न करण्यासाठी अडचण आहे. माझे आणि तुझे शिक्षण झाल्यावर आपण लग्न करु, असे म्हणाला. त्यानंतर विविध ठिकाणी फिरायला नेवून वारंवार लग्नाचे अमिष जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. तसेच बीड शहरात एका ठिकाणी किरायची रुम करुन मला तिथे ठेवून तिथेही शारिरीक संबंध केले. त्यानंतर एका मुलीसोबत विवाह करत असल्याची माहिती मिळाली. तसेच स्टेटला साखरपुड्याचे फोटो दिसले. त्यानंतर त्या मुलीसोबत विवाहही केला. व मला तुला काय करायचे ते कर, तुझी आमची कास्ट वेगळी आहे. मी लग्न करु शकत नाही, कुठे तक्रार द्यायची तिथे दे, माझं कुणीही वाकडं करु शकत नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरुन गणेश हनुमंत तावरे विरुद्ध अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून प्रकरणाचा अधिक तपास पिंक पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक अंतरप हे करत आहेत.

Tagged