pankja munde

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला ‘धक्का’ नसून ‘धोका’ मिळाला

न्यूज ऑफ द डे बीड राजकारण

पंकजाताई मुंडे यांची ओबीसी आरक्षणाबद्दल प्रतिक्रिया

मुंबई : ओबीसी च्या राजकीय आरक्षणाला ‘धक्का’ नसून ‘धोका’ मिळाला आहे अशी प्रतिक्रिया भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत दिली आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. याविषयी मागासवर्गीय आयोगाने सादर केलेला अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत पुढचा निर्देश देत नाही, तोपर्यंत ओबीसी आरक्षणासह या निवडणुका घेतल्या जाणार नाहीत असे स्पष्ट झाले आहे. यावर पंकजाताई मुंडे यांनी ट्विट केले आहे, त्या म्हणाल्या, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला ‘धक्का’ नसून ‘धोका’ मिळाला आहे. राज्यातील ओबीसींचे राजकीय व्यासपीठ, संधी आणि भविष्य संपवण्याचा अधिकार कोणाला नाही. ओबीसी राजकीय आरक्षण नाही तर निवडणूक नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

Tagged