जिल्हाबाहेर जाऊन पंकज कुमावतांच्या चार कारवाया!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा


साडे सात लाखांचा मुद्देमाल जप्त 13 जणांवर गुन्हा दाखल
बीड दि. 16 : बीड जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाई करणाऱ्या सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी आपला मोर्चा शेजारील जिल्ह्याकडे वळवला आहे. शनिवारी (दि.16) सायंकाळी पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाणे हद्दीतील विहामांडवा परिसरात चार ठिकाणी कारवाई करत साडे सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमावत यांच्या कारवाईने अवैध धंदे चालकांची धांदल उडाली आहे. ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील प्रकाश बाबासाहेब रोडगे, अरुण फटांगडे यांच्या लॉटरी जुगारावर धाड टाकून पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याच परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्या राहुल कृष्णा नागवे यास पकडून त्याकडून 31 हजार 406 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पाचोड जामखेड बस स्थानक परिसरात गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करत 3 लाख 40 हजार 635 रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी कृष्णा अंकुश नारळे, 17 वर्षीय दोन विधिसंघर्षग्रस्त बालक, इरफान आलम पठाण, अनिल भाऊसाहेब भोजने, ताराचंद भाऊसाहेब भोजने यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच विवाह मांडवा रोडवर मेहमूद बाबामिया तांबोळी, अशपाक अजिज शेख, शब्बीर भाई, नफिज शेख या गुटखा फेरीवाल्याना पकडत त्यांच्याकडून अकरा हजाराचा गुटखा जप्त केला. असा एकूण
7 लाख 34 हजार 245 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी 13 जणांवर पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपनिरीक्षक संतोष भालेराव, महिला पोलीस उपनिरीक्षक सिमाली कोळी, पोलीस हवालदार बालाजी दराडे, पोलीस नाईक राजू वंजारे, विकास चोपणे, अनिल मंदे, महादेव सातपुते, महादेव बहिरवाळ, संजय टूले यांनी केली आहे.

Tagged