बीड : आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मातोश्री माजी जिल्हा परिषद सदस्या रेखाताई रवींद्र क्षीरसागर (वय ६५) यांचे निधन आज (दि.२०) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
घरी असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने जिल्हा रुग्णालयात आणले होते. यावेळी वैद्यकीय तज्ञांनी हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे घोषित केले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच चाहत्यांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात पती रवींद्र क्षीरसागर, मुले आमदार संदीप क्षीरसागर, माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर व सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. क्षीरसागर कुटुंबियांच्या दुःखात दैनिक कार्यारंभ परिवार सहभागी आहे.
गुरुवारी अंत्यसंस्कार
रेखाताई क्षीरसागर यांच्या पार्थिवावर गुरुवार दिनांक 21 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता राजुरी येथील मळ्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती क्षीरसागर कुटुंबियांकडून देण्यात आली.