PAKISTAN AFAGANISTAN

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हल्ला

देश विदेश न्यूज ऑफ द डे

नवी दिल्ली, दि.31 : अफगाणिस्तानच्या नागरी वस्त्या असलेल्या भागात पाकिस्तानने रॉकेट हल्ला केला आहे. पाकिस्तानी सैन्याच्या या हल्ल्यात 9 नागरिकांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जखमी झाले असल्याची माहिती अफगाणिस्तानमधील माध्यमांनी दिली आहे. कंधार प्रांतामधील स्पीन बोल्डक जिल्ह्यात हा हल्ला केला गेला. पाकिस्तानी हल्ल्यानंतर अफगाणिस्ताननेही प्रत्युत्तरासाठी सैन्य सज्ज ठेवले आहे. या संबंधीचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. या हल्ल्याचं कारण मात्र समजू शकले नाही. जग कोरोनाशी लढत असताना पाकिस्तानला सुचत असलेल्या युध्दाच्या खुमखुमीने वातवरण तापण्याची शक्यता आहे.

Tagged