raj thakare

लोक वेगळ्या विवंचनेत, राम मंदिर भुमिपुजन दोन महिने पुढे ढकलता आले असते

देश विदेश न्यूज ऑफ द डे

राम मंदिराच्या भुमीपुजनावरून राज ठाकरे यांनी प्रथमच मांडली भुमिका

मुंबई, दि.31 : खरं तर राम मंदिर व्हायला हवं. पण आता लोक वेगळ्या विवंचनेत आहेत. भुमीपुजनाची ही वेळ नाही. परंतु केंद्राने ही वेळ का निवडली याची कल्पना नाही. अजून दोन महिन्यांनी धुमधडाक्यात भुमीपुजन करता आलं असतं. लोकांनाही या आनंदात सहभागी होता आले असते, अशा शब्दात राज ठाकरे यांनी राम मंदिर भुमीपुजना संदर्भात आपली भुमिका मांडली आहे.

एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, यात दोन गोष्टी आहे. पहिली गोष्ट राम मंदिर झालं पाहिजे का? तर निश्चित झालं पाहिजे. ही माझी आजची नाही, माझी आधीपासूनची भूमिका आहे आणि ती मी जाहीर सभांमधून मांडली आहे. ज्यासाठी म्हणून इतके कारसेवक त्याच्यासाठी गेले. त्याच्या खोलात जायची आता आवश्यकता नाही, त्याचं जर भूमिपूजन होत असेल तर माझ्यासाठी, माझ्या पक्षासाठी अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. परंतु मला वाटत आता ती वेळ नाही. लोक आता एका वेगळ्या विवंचनेत आहेत. काय आहे, भूमिपूजन होईल, एका दिवसाची बातमी होईल, एका दिवसाच्या चर्चा होतील. पण, यापलीकडे कोणीच त्या मानसिकतेत नाही. झालं आनंद आहे. खरं उभं राहिलं त्यावेळी जास्त आनंद होईल. मला आता कल्पना नाही, त्यांनी आता का ठरवलं. राम मंदिराचं भूमिपूजन धुमधडाक्यात व्हायला पाहिजे. आता गरज नाही. दोन महिन्यांनी झालं असतं तरी चाललं असतं. कारण सगळं स्थिरस्थावर झालं असतं तर लोकांना आनंद घेता आला असता, असं राज ठाकरे म्हणाले.

Tagged