अनामिका शुक्ला असे या शिक्षीकेचे नाव आहे. ही शिक्षिका कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात विज्ञान विषय शिकवते. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज, आंबेडकरनगर, अलिगड, सहारनपूर, बागपत अशा जिल्ह्यांतील केजीबीव्ही शाळांमध्ये अनामिकाची पोस्टिंग सापडली आहे. या शाळांमध्ये शिक्षकांची नेमणूक कंत्राटी पद्धतीने केली जाते आणि त्यांना दरमहा 30 हजार रुपये पगार दिला जातो. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कस्तुरबा गांधी शाळा आहे. त्यामुळे अशाप्रकारे आणखी काहीजण फसवणूक करत नाहीत ना? याचीही चौकशी केली जात आहे. हे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
