MURDER

अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या!

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे बीड

घटनेने खळबळ उडाली
गेवराई दि.14 : अनैतिक संबंधातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना गुरुवारी (दि.14) रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी घटनास्थळी गेवराई पोलीसांनी धाव घेतली असून पुढील तपास करत आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.

बबन ज्ञानोबा खरसाडे (वय 45 रा.तळणेवाडी वस्ती गेवराई) असे मयताचे नाव आहे. गावातीलच एका महिलेसोबत त्यांचे अनैतिक संबंध होते. आरोपीने गुरुवारी रात्रीच्या सुमारास गावालगतच शेतामध्ये खरसाडे यांच्यावर चाकूने पोटात सपासप वार केले आणि घटनास्थळावरुन पसार झाले. पोटात गंभीर वार झाल्याने खरसाडे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले, त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तुकाराम बोडखे, पोह.उबाळे, पोशि.शेखर हिंगेवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.

Tagged