crime

‘त्या’ सात जणांची आत्महत्या नसून अंधश्रद्धेतून केली हत्या!

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र


बीड दि.25 ः दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत गेवराई तालुक्यातील एका कुटूंबीयांतील सात जणांचे मृतदेह आढळून आले होते. या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. सुरुवातील कौटूंबिक वादातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पंरतू ही अंधश्रद्धेतून केलेली हत्या असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलीसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.

पोलीससुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोहन पवार, संगीता पवार, मुलगी राणी फुलवरे, जावई श्याम फुलवरे आणि त्यांची तीन लहान मुले यांचा मृतदेह भीमा नदीपात्रात आढळून आला होता. मोहन पवार यांचा मुलगा तीन महिन्यांपूर्वी अनिल पवार आणि त्याचा चुलत भाऊ धनंजय पवार हे एकत्र त्यांच्या पेरणे फाटा इथे असलेल्या सासुरवाडीला गेले असता त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात धनंजय पवार यांचा मृत्यू झाला. धनंजयचा मृत्यू हा अपघात नसून घातपात झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबियांना होता. मोहन पवार आणि कुटुंबियांनी काळी जादू केली आणि त्यामुळेच धनंजयचा मृत्यू झाला असं त्याच्या कुटुंबाला वाटत होते. अपघात दोघांचा झाला मात्र यात फक्त धनंजयचा मृत्यू कसा झाला? असा राग धनंजयच्या कुटुंबाच्या मनात होता. त्यामुळे धनंजयच्या कुटुंबीयांनी मोहन पवार यांच्या कुटुंबाचा काटा काढायचं ठरवलं होतं. मोहन आणि त्यांचे कुटुंबीय 17 जानेवारी रोजी भीमा नदीजवळ आल्यानंतर धनंजय याच्या घरच्यांनी त्यांची वाट अडवली. त्यांनी मोहन पवार, त्यांची पत्नी, मुलगी आणि जावयाला बेशुद्ध करुन त्यांच्यासोबत असलेल्या तीन मुलांनासह नदीत फेकलं. पाण्यात बुडून या सात जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीसांनी चौघांना ताब्यात घेतले असून अधिक तपास करत आहेत.

Tagged