एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर केली जाईल,त्यांनी मुंबईत यावे- खा.राऊत

बीड

मुंंबई दि.21 : सरकार स्थिरच आहे. यापुर्वीही अनेक संकटं या सरकारवर आलेली आहेत. एकनाथ शिंदे यांची काही नाराजी असेल तर त्यांनी मुंबईत येवून व्यक्तीगत चर्चा करावी, नक्कीच त्यांचे गैरसमज दूर केले जातील. हे सरकार टिकेल असेही खा.संजय राऊत म्हणाले आहेत.

पत्रकारांशी संवाद साधताना खा.संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि आम्ही सोबत काम केलेले आहे. त्यांचे जे काही गैरसमज झाले असतील ते नक्कीच दूर केले जातील. त्यांनी मुंबई येथे यावे चर्चा करावी. त्यांचे आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे, आणि त्यांचीच राहिल. सुरतला एकनाथ शिंदे यांच्याकडे तिथे जावून चर्चा करणे हे शिवसेनेचे काम नाही. तसेच एकनाथ शिंदे सोबत घेवून गेलेल्या आमदरांच्या जीवला धोका आहे. त्यांच्या कुटूंबीयांच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने मुंबई पोलीसांना अ‍ॅक्शन घ्यावी लागेल असेही खा.संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच दोघेजण एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले आहेत. ते चर्चा करतील असेही राऊत म्हणाले आहे.

Tagged