दि.21 : शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास 20 तासानंतर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या शिकवणीशी प्रतारणा करणार नाही असे शिंदे यांनी म्हटले. दरम्यान, शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदावरून हटवले आहे. गटनेते म्हणून अजय चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे दुपारी पत्रकार परिषद घेणार होते. मात्र त्यांची पत्रकार परिषद झाली नाह. परंतू त्यांनी आपल्या ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उल्लेखही न करता पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंददिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.’ असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. आता पुढे एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी मंत्री, आमदार मुंबईकडे रवाना झाले आहेत.