mete accident truck

विनायक मेटे यांच्या गाडीला धडक देणारा ट्रक चालक पोलीसांच्या ताब्यात!

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र राजकारण

रायगड –शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे vinayak mete यांच्या गाडीच्या अपघातासाठी जो ट्रक कारणीभूत ठरला आहे त्याची ओळख पटली असून तो ट्रक पालघरमधील असल्याचं सांगितले जाते. या ट्रकच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सध्या हा ट्रक गुजरातमध्ये असल्याने रायगड पोलिसांची एक तुकडी गुजरातला रवाना करण्यात आली होती. या टीमने ट्रक चालकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे.

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर आज शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या कारचा भीषण अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्या ट्रक बरोबर हा अपघात घडला तो ट्रक पालघर जिल्ह्यातील कासा येथील असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या ट्रकचा नंबर डीएन 09 पी 9404 असा असून हा ट्रक आयसर कंपनीचा असल्याची माहिती आहे. या ट्रक चालकाचे नाव उमेश यादव असं असल्याचं सांगितलं जातं. हा ट्रक ताब्यात घेण्यासाठी पालघर पोलीस गुजरातमधील वापी येथे रवाना झाले होते. ट्रकची ओळख पटविण्यासाठी ट्रक मालकाला सोबत घेतले त्यानंतर ट्रक चालकाला पोलीसांनी ताब्यात देखील घेतले आहे.
दरम्यान, ट्रकची ओळख पटणं ही या तपासातील महत्त्वाची गोष्ट असून त्यामुळे हा अपघात होता की घातपात याच्या तपासाला गती मिळणार आहे.

Tagged