बीडमध्ये बससस्थानक परिसरात दिवसाढवळ्या युवकाची हत्या!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.14 : धारदार शस्त्राने सपासप वार करत एका युवकाची हत्या करण्यात आली. ही थरारक बीड शहरातील बसस्थानक परिसरातील एचडीएफसी बँकेसमोर दिवसाढवळ्या घडली. या घटनेने शहरत खळबळ उडाली असून मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती.
शेख शाहिद शेख सत्तार (वय 24 रा.खासबाग, बीड) असे मयताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शेख शाहिद शेख सत्तार हे ट्रॅव्हल्सला प्रवाशी मिळवून देण्याचे काम करतात. मंगळवारी (दि.14) सायंकाळच्या सुमारास त्यांचा प्रवाशी भरण्यावरुन वाद झाल्याची माहिती आहे. त्यानंतर चौघांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला, सपासप वार केले अन् घटनास्थळावरुन पलायन केले. योवळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शेख शाहिद यांना येथील काही नागरिकांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी शहर पोलीसांनी धाव घेतली असून आरोपींचा शोध घेत आहेत. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या शस्त्राने वार करत तरुणाचा खून केल्याने खळबळ अडाली आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Tagged