शेतीच्या जुन्या वादातून तलवारीने प्राणघातक हल्ला!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड वडवणी

बीड दि.14 : 15 वर्षापासून सुरु असलेल्या शेतीच्या वादातून एका शेतकर्‍यावर तलवारी सारख्या शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. आरोपींनी सर्व वार हे डोक्यात व चेहर्‍यावर केले आहेत. गंभीररित्या जखमी झालेल्या शेतकर्‍यास बीड शहरातील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना धारुर तालुक्यातील तेलगाव कारखान्यासमोर मंगळवारी घडली आहे.
संभाजी कारभारी वडचकर (वय 52 रा.कुप्पा ता.वडवणी जि.बीड) असे जखमी शेतकर्‍याचे नाव आहे. 15 वर्षापासून त्यांचा शेतीचा वाद आहे. या संदर्भात त्यांनी दोन महिन्यापूर्वी पोलीसात तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांच्यावर गावातीलच पाच ते सहा जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. जखमीवर लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. प्रकृती चिंताजनक असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

Tagged