Sharad Pawar

शरद पवारांचा राजीनाम्याबाबत मोठी बातमी

न्यूज ऑफ द डे बीड

राष्ट्रवादीच्या सदस्य समितीने एकमताने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई : राष्ट्रवादीच्या सदस्या समितीनं शरद पवार यांनी घेतलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय फेटाळला आहे.

‘लोक माझे सांगाती’ याच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. शरद पवारांच्या घोषणेनंतर सभागृहात एकच गदारोळ झाला. साहेब निर्णय मागे घ्या, कार्यकर्त्यांनी मागणी करत ठिय्या दिला होता. तेव्हापासूनच शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्या, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. शरद पवारांनी त्यावेळी चेंडू राष्ट्रवादीच्या सदस्य समितीच्या कोर्टात टोलावला होता. त्यामुळे समितीनं राजीनामा फेटाळल्यानंतर शरद पवार काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. परंतु शरद पवारांचा राजीनामा फेटाळला आहे. हा निर्णय राष्ट्रवादीच्या सदस्य समितीने एकमताने घेतला असल्याची माहिती खा.प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

Tagged