MURDER

दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृण खून!

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे


अंबाजोगाई दि. 25 : तालुक्यातील चीचखंडी शिवारात एका २२ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना रविवारी (दि.२५) सकाळी उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली असून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.

अर्जुन पंढरी गडदे (वय २२, रा.चीचखंडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता होता. रविवारी सकाळी चीचखंडी शिवारात रस्त्याच्या बाजूला त्याचा मृतदेह आढळून आला. अर्जुनच्या शरीरावरील घाव पाहता दगडाने चेहऱ्यावर, डोक्यात मारून आणि गळा आवळून त्याचा खून करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tagged